मी सौ. सुनीता लक्ष्मण क्षीरसागर, राहणार, केशेगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. मला 24 जानेवारी 2019 रोजी, शौचास गेले असता कडक शौचास झाल्यामुळे लहानशी जखम झाली, पुढचे 2 ते 4 दिवस खूप प्रचंड वेदना होत होत्या. आम्हाला कळेनासे झाले की नक्की काय होत आहे. आम्ही सुरुवातीला सोलापूर येथे मुळव्याध तज्ञ डॉक्टरांकडे दाखवले. तरी डॉ क्टरांना योग्य निदान होत नव्हते व त्यांनी तात्पुरते औषधी दिल्या. काही केल्या त्रास कमी होत नव्हता. शौच्या च्या जागी सूज येऊन मोठी गाठ 2-3 दिवसात तयार झाली. माझ्या एका नातें वाईकांनी विठ्ठल हॉस्पिटल डांगे चौक व डॉ. अतुल पाटील यांच्या विषयी माहिती दिली. आम्ही 3 फेब्रुवारी दिवशी ह्या ठिकाणी आलो. डॉक्टरांना भेटलो असता आम्हाला ह्या आजारा विषयी माहिती झाली व बरा होण्याचा दिलासा मिळाला.
डॉक्टरांनी त्वरित ओपरेशन करण्याचा सल्ला दिला. माझे ओपरेशन झाले व त्या गाठीतून भरपूर पुयस्त्राव बाहेर आला. डॉक्टरांनी आम्हाला सर्व बाबी दाखवल्या व समजावून सांगितले. त्यानंतर आम्हाला 1 महिना एक दिवसा आड ड्रेसिंग करावी लागली. आज रोजी मी ठणठणीत आहे. मी इतर ठिकाणीही ह्याचा खर्चाविषयी तपास केले असता अतिशय अल्प दरात माझे ओपरेशन येथे झाल्याचे मला कळाले. हॉस्पिटल मध्ये इतर रुग्णांकडून माहिती घेतले असता पुण्यातील 10 वर्षा पासूनचे हे उत्तम ठिकाण असल्याचा अनुभव आला. मला जो आजार झाला त्याला perianal abscess म्हणतात. व यातूनच भगंदर होण्याची शक्यता असते व त्यापासून डॉक्टर अतुल पाटील सरांनी कौशल्याने वाचवले. हा आजार अतिशय त्रासदायक असला तरी पूर्ण पणे बरा होणारा आहे. डॉक्टर व येथील स्टाफ यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी ह्या दुर्धर आजारापासून मुक्त झाले. एखाद्या स्त्रीला असा आजार होणे प्रचंड त्रासदायक व मन खच्चीकरण करणारे असते पण पण विठ्ठल हॉस्पिटल मधील आनंदी व खेळीमेळीचे वातावरणाने माझा आत्मविश्वास यत्किंचितही ढळू दिला नाही.
यासाठी मी डॉक्टर व स्टाफ यांची आयुष्यभर ऋणी राहिन.